रुग्ण शिक्षण

रुमॅटोलॉजी (संधिवात) म्हणजे काय?

संधिवाताच्या रोगाचे निदान आणि उपचार सहजतेने व्हावे यासाठी वेगाने विकसित होणारी एक वैद्यकीय उपशाखा म्हणजे रुमॅटोलॉजी. या रोगांचा प्रभाव मुख्यत्वेकरून सांधे, टेंडन(tendons), अस्थिबंध(लिगामेंट), हाडे आणि स्नायूंवर होतो. यामध्ये 200 पेक्षा जास्त प्रकारचे रोग समाविष्ट आहेत, ज्यात रुमेटॉईड आर्थरायटिस, ऑस्टियोआर्थरायटिस, गाऊट, पाठदुखी, ऑस्टियोपोरोसिस, लुपस आणि टेंडिनायटिस यांसारख्या 200 पेक्षा जास्त आजारांचा समावेश आहे. यापैकी काही आजार एवढे गंभीर आहेत की ज्यांचे निदान व त्यावरील उपचार बिकट आहेत. संधिवाताच्या आजाराचा परिणाम शरीराच्या अंतर्गत अवयवांवर देखील होऊ शकतो.

ऑटोईम्युन सिस्टममधील असंतुलन हे संधिवाताच्या सर्व प्रमुख विकारांचे कारण असल्याचे आता सिद्ध झाले आहे. याच कारणामुळे, संधिवाताच्या रोगांना बहुतेक वेळा ऑटोईम्युन रोग म्हणूनही ओळखले जाते. याच्या उपचार पद्धती देखील ऑटोईम्युन प्रणालीवरील क्लिनिकल संशोधनावर आधारित आहेत. सखोल संशोधनातून औषधांचा प्रभावीपणा सिद्ध झालेल्या उपचार पद्धतीमुळे या विकारांनी ग्रस्त असणार्‍या रुग्णांना सामान्य जीवन जगण्यास साहाय्य होते.

या आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे त्यांना विशेष उपचार देणार्‍या तज्ज्ञ डॉक्टरांची गरजही वाढते आहे. यामुळे सर्व देशांमध्ये संधिवाततज्ज्ञ डॉक्टरांची संख्या वाढताना दिसून येत आहे.

संधिवाततज्ज्ञ (रुमॅटोलॉजिस्ट) कोणास म्हणले जाते?

संधिवात आणि संधिवाताशी संबंधित रोगांचे निदान आणि उपचार करणारे विशेषज्ञ डॉक्टर्स म्हणजे संधिवाततज्ज्ञ. सांधे, हाडे, स्नायू आणि इतर अंतर्गत अवयवांवर (उदा. मूत्रपिंड, फुफ्फुसे, रक्तवाहिन्या, मेंदू) परिणाम करणार्‍या विविध प्रकारच्या 200 हून अधिक आरोग्य समस्यांवर संधिवाततज्ज्ञ उपचार करतात. संधिवात आणि संबंधित रोगांवर शस्त्रक्रियेशिवाय उपचार करण्यावर संधिवाततज्ज्ञ भर देतात. या गंभीर तसेच कधीकधी प्राणघातक ठरू शकणार्‍या आजारांचे निश्चित कारण शोधण्यासाठी तसेच या आजारांवर अधिक चांगले उपचार करता यावेत, यासाठी अनेक संधिवाततज्ज्ञ यावर संशोधनही करीत असतात.

संधिवात, विशिष्ट ऑटोइम्युन रोग, वास्क्युलायटिस, मस्क्युलस्केलेटल वेदनांचे विकार तसेच ऑस्टियोपोरोसिस यांवर संधिवाततज्ज्ञ उपचार करतात. यामध्ये 200 पेक्षा जास्त प्रकारचे रोग समाविष्ट आहेत, ज्यात रुमेटॉईड आर्थरायटिस, ऑस्टियोआर्थरायटिस, गाऊट, पाठदुखी, ऑस्टियोपोरोसिस, लुपस आणि टेंडिनायटिस यांसारख्या 200 पेक्षा जास्त आजारांचा समावेश आहे. यापैकी काही आजार एवढे गंभीर आहेत की ज्यांचे निदान व त्यावरील उपचार बिकट आहेत.

संधिवाततज्ज्ञांचे प्रशिक्षण कशाप्रकारे प्रशिक्षित केले जाते?

संधिवाततज्ज्ञ होण्याचा वैद्यकीय प्रवास हा अनेक वर्षांच्या प्रदीर्घ शिक्षण आणि प्रशिक्षणाद्वारे पूर्ण होतो. आपला पाच वर्षांचा वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर हे डॉक्टर्स इंटर्नल(जनरल) मेडिसीनमध्ये तीन ते चार वर्षे निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत असतात. यानंतर संधिवातशास्त्राच्या विशिष्ट प्रशिक्षणाचा तीन ते पाच वर्षांचा कालखंड पूर्ण केल्यानंतर कठीण अशी राष्ट्रीय परीक्षा उत्तीर्ण होणे त्यांना अनिवार्य असते.

संधिवात आणि संधिवाताचे रोग म्हणजे नक्की काय?

सोप्या शब्दांत वर्णन करायचे तर संधिवात म्हणजे सांध्यांवरील सूज (लालसरपणा, उष्णता वाढणे, सूज येणे आणि वेदना होणे) होय. सांध्यांवर येणारी सूज हे आजाराचे निदान नसून एक लक्षण आहे. संधिवाताच्या विकारांच्या विस्तृत श्रेणीमध्ये याचा समावेश होतो. या रोगांचा प्रभाव मुख्यत्वेकरून सांधे, टेंडन(tendons), अस्थिबंध(लिगामेंट), हाडे आणि स्नायूंवर होतो. वेदना, सूज आणि ताठरपणा ही याची सामान्य लक्षणे आहेत. संधिवाताच्या आजाराचा परिणाम शरीराच्या अंतर्गत अवयवांवर देखील होऊ शकतो.

संधिवाताच्या विकारांमध्ये 200 पेक्षा जास्त प्रकारचे रोग समाविष्ट आहेत. संधिवातजन्य रोगांना सहसा संयोजी उतींच्या(connective tissue) आजाराचे कारण मानले जाते. कारण, या आजारांमुळे शरीराची रचना तसेच शरीराच्या अंतर्गत अवयवांच्या आधारभूत रचनेवर प्रभाव पडत असतो. या आजारांना ऑटो-इम्यून रोग म्हणून देखील ओळखले जाते. कारण, हे आजार तेव्हा उद्भवतात जेव्हा सामान्यपणे संसर्ग आणि आजारांपासून शरीराचे संरक्षण करणारी रोगप्रतिकारक शक्ती शरीरातील निरोगी पेशींवर हल्ला करते.

संधिवाताचे आजार कशामुळे होतात?

संधिवाताचे रोग सामान्यतः जनुकीय कारणे तसेच पर्यावरणीय घटकांच्या संयोगामुळे होत असल्याचे मानले जाते. सोप्या शब्दांत असे सांगता येईल, आपणास जन्मतःच हा आजार असण्याची शक्यता असू शकते परंतु रोगाची सुरुवात मात्र विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्यास होते.

यापैकी काही घटक ज्ञात झाले आहेत. उदाहरणार्थ, वारंवार होणार्‍या दुखापतीमुळे कूर्चा(cartilage) कमकुवत होणे अथवा सांध्यांवर येणारा अतिरिक्त ताण यांची भूमिका ऑस्टियोआर्थरायटिसमध्ये महत्वाची ठरते. काही विशिष्ट विषाणूंमुळे अंनुवंशिकदृष्ट्या संवेदनशील व्यक्तींमध्ये हे रोग उद्भवू शकतात. संधिवाताच्या काही रोगांमध्ये लिंगभेदही लागू होतो. लुपस, रूमेटॉइड आर्थरायटिस, स्क्लेरोडर्मा आणि फाइब्रोमायल्जीया हे आजार सामान्यतः पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात आढळून येतात. यावरून हे दिसून येते की हे आजार उद्भवण्यामध्ये हार्मोन्स अथवा स्त्री पुरुषांमधील नैसर्गिक भिन्नता महत्वाची ठरते.

संधिवाताची सामान्य लक्षणे

  • एका किंवा अधिक सांध्यांवर सूज येणे
  • सकाळी लवकर किंवा बराच काळ निष्क्रिय राहिल्यानंतर सांध्यांमध्ये ताठरता येणे
  • सांध्यांमध्ये वारंवार किंवा आवर्ती वेदना अथवा नाजुकपणा येणे
  • सांध्यांची सामान्य हालचाल करताना त्रास होणे
  • सांध्यांमध्ये उष्णता निर्माण होणे तसेच लालसरपणा येणे

तुम्हाला माहित आहे का?

  • लहान मुलांनाही संधिवात होऊ शकतो.
  • RA साठी नवीन उपचार पद्धती उपलब्ध आहेत, ज्यामुळे रोग वाढण्यास प्रतिबंध होऊ शकतो.
  • RA ची लक्षणे दिसू लागल्यानंतर 12 आठवड्यांच्या आत सांध्यांची कायमस्वरूपी हानी होण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. लवकरात लवकर उपचार सुरू करणे सांध्यांच्या हानीला प्रतिबंध करते. 
  • RA मुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा तसेच स्ट्रोकचा धोका वाढतो.
  • हाडे फ्रॅक्चर होईपर्यंत रुग्णांमध्ये ऑस्टियोपोरोसिसची कोणतीही लक्षणे आढळत नाहीत.  
  • आमवाताच्या सुरुवातीच्या काळात रक्त तपासणी आणि सांध्यांच्या तपासणीचे रिपोर्ट्स हे सामान्य(normal) असू शकतात.
  • कोणत्याही सामान्य व्यक्तीमध्ये रूमेटॉइड फॅक्टर आणि ANA आढळून येऊ शकतात.
  • संधिवातामधील बदल ओळखण्यासाठी अल्ट्रासाऊंड स्कॅन हे साध्या क्ष-किरण (X-ray ) चाचणीपेक्षा 7 पट अधिक संवेदनशील आहे.

मेथॉट्रॅक्सेट बद्दल माहिती

  • मेथॉट्रॅक्सेट हे रोगाप्रमाणे बदलून देता येणारे औषध आहे. केवळ रोगाच्या लक्षणांवर उपचार न करता हे सांध्यांची होणारी हानी थांबविण्यास मदत करते.
  • हे वेदनाशामक औषध किंवा स्टिरॉइड नाही.
  • या औषधामुळे साधारणपणे 6 आठवड्यांत फरक दिसू लागतो. परंतु परिणाम पूर्णपणे दिसून येण्यास 12 आठवड्यांचा कालावधी लागू शकतो.     
  • मेथॉट्रॅक्सेट आठवड्यातून एकदाच घ्यावे. दररोज घेतल्यास ते अपायकारक ठरते.
  • या औषधाचे यकृत / रक्तपेशींवर साईड इफेक्ट्स होत आहेत का? हे शोधण्यासाठी नियमितपणे रक्त तपासणी करणे आवश्यक आहे.                                     
  • मेथॉट्रॅक्सेटचे साईड इफेक्टस टाळण्यासाठी आपण आठवड्यातून 5 दिवस फॉलिक ऍसिड गोळ्या घ्याव्या. आपण ज्या दिवशी मेथॉट्रॅक्सेट घेता त्या दिवशी आणि पुढे नमूद केलेल्या परिस्थितीमध्ये फॉलिक ऍसिड घेऊ नका (खाली उदाहरण पहा).

– जर तुम्हाला कुठल्या प्रकारचे इन्फेक्शन झाले असेल, ज्यासाठी तुम्हाला ऍन्टीबायोटिक्स घ्यावे लागत आहे, तर अशा परिस्थितीमध्ये मेथॉट्रॅक्सेट 2 आठवड्यांसाठी थांबविणे तसेच आपल्या संधिवाततज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरते.

– मेथॉट्रॅक्सेट घेत असताना अल्कोहोलचे सेवन केल्याने यकृत(liver) खराब होण्याचा धोका वाढतो.  

– गर्भवती असणार्‍या अथवा गर्भवती होऊ इच्छिणार्‍या स्त्रियांनी मेथॉट्रॅक्सेट घेऊ नये.

– वेळोवेळी फॉलो अप घेतल्याशिवाय, तसेच आपल्या संधिवाततज्ज्ञांच्या देखरेखीशिवाय या औषधाचे सेवन सुरू ठेवणे धोकादायक ठरू शकते.

SundayMondayTuesdaWednesdayThursdayFridaySaturday
Methotrexate——–Folic acidFolic acidFolic acidFolic acidFolic acid

मेथॉट्रॅक्सेट सुरू करण्यापूर्वी हे करा:

  • छातीचा एक्स-रे
  • रक्त तपासणी – पूर्ण ब्लड काऊंट, यकृत(liver) आणि मूत्रपिंड.
  • ऍक्टिव्ह इन्फेक्शन टाळणे

Sulphasalazine बद्दल माहिती

  • Sulphasalazine हे रोगाप्रमाणे बदलून देता येणारे औषध आहे. केवळ रोगाच्या लक्षणांवर उपचार न करता हे सांध्यांची होणारी हानी थांबविण्यास मदत करते.
  • हे वेदनाशामक औषध किंवा स्टिरॉइड नाही.
  • या औषधामुळे साधारणपणे 6 आठवड्यांत फरक दिसू लागतो. परंतु परिणाम पूर्णपणे दिसून येण्यास 12 आठवड्यांचा कालावधी लागू शकतो.     
  • Sulphasalazine दररोज घ्यावे.
  • या औषधाचे यकृत / रक्तपेशींवर साईड इफेक्ट्स होत आहेत का? हे शोधण्यासाठी नियमितपणे रक्त तपासणी करणे आवश्यक आहे.
  • जर तुम्हाला कुठल्या प्रकारचे इन्फेक्शन झाले असेल ज्यासाठी तुम्हाला ऍन्टीबायोटिक्स घ्यावे लागत आहे, तर अशा परिस्थितीमध्ये Sulphasalazine 2 आठवड्यांसाठी थांबविणे तसेच आपल्या संधिवाततज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरते.
  • गर्भावस्थेमध्ये Sulphasalazine घेणे निर्धोक मानले जाते. तथापि, यासाठी आपल्या संधिवाततज्ज्ञांचा सल्ला घेणे मात्र आवश्यक आहे.
  • वेळोवेळी फॉलो अप घेतल्याशिवाय, तसेच आपल्या संधिवाततज्ज्ञांच्या देखरेखीशिवाय या औषधाचे सेवन सुरू ठेवणे धोकादायक ठरू शकते.

Sulphasalazine सुरू करण्यापूर्वी हे करा

  • रक्त तपासणी – पूर्ण ब्लड काऊंट, यकृत(liver) आणि मूत्रपिंड.
  • ऍक्टिव्ह इन्फेक्शन टाळणे
  • सल्फा औषधांची ऍलर्जी आहे का याची तपासणी.

पुढील कारणांसाठी आपल्या संधिवात तज्ज्ञांशी संपर्क साधा-

  • ताप / संसर्ग
  • रॅश (पुरळ)
  • गर्भधारणेचे नियोजन

वेदना कसे कार्य करते

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

सर्वसाधारणपणे सांगायचे झाल्यास, हे दोन्ही डॉक्टर्स मस्क्युलस्केलेटल रचनेच्या समस्यांवर इलाज करतात. परंतु, संधिवाततज्ज्ञ औषधांच्या माध्यमातून, विना शस्त्रक्रिया उपचार करतात तर अस्थिरोगतज्ज्ञ शस्त्रक्रियांद्वारे उपचार करतात. अधिक सोप्या शब्दांत असे म्हणता येईल, सांधेदुखीचे कारण स्पष्ट नसल्यास आधी संधिवाततज्ज्ञांना दाखवणे इष्ट ठरेल. सांध्यांवरील सूज आणि वेदनांचे कारण शोधण्यासाठी आवश्यक संशोधन करण्यासाठी संधिवाततज्ज्ञांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. योग्य उपचार लवकर सुरू करता यावेत यासाठी लवकरात लवकर अचूक निदान होणे गरजेचे असते. हे सिद्ध झाले आहे की, उपचार लवकर सुरू केल्यास सांध्यांचे दीर्घकाळासाठी होणारे नुकसान टाळण्यास मदत होते व त्यामुळे शस्त्रक्रियेची आवश्यकता टाळता येते.

काही जण वनौषधी, तेल, विशिष्ट आहार अथवा व्यायाम यांसारख्या उपचाराने बरे झाल्याचा दावा करतात. तथापि, या उपचारांनी रुग्ण बरे होत असल्याचा कोणताही शास्त्रीय पुरावा उपलब्ध नाही. महत्वाची बाब म्हणजे, अशा अशास्त्रीय उपचारांचे गंभीर साईड इफेक्ट्स होऊ शकतात. तसेच, योग्य उपचार सुरू करण्यास विलंब केल्यास सांध्यांचे भरून न निघणारे नुकसान होऊ शकते.

आयुर्वेदिक उपचार पद्धतींमध्ये विविध प्रकारच्या अनेक घटकांचा व औषधांचा वापर केला जातो. अन्य अशास्त्रीय पारंपारिक औषधांप्रमाणे, आयुर्वेदिक उत्पादनांमध्येही खराब गुणवत्ता असणार्‍या घटकांचा वापर झाला असल्याचा धोका असतो. काही आयुर्वेदिक उत्पादनांमध्ये स्टेरॉईड्स तसेच पारा, आर्सेनिक आणि शिसे यांसारख्या जड धातूंचा अर्क मिसळल्याने ती दूषित होतात.    

 

आयुर्वेदिक औषधे घेण्याचा विचार करत असाल तर –

आपल्या आजाराविषयी अधिक माहिती घेण्यासाठी तसेच पारंपरिक उपचारांना झालेल्या विलंबाच्या परिणामांविषयी आपल्या संधिवातज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.      

तुम्ही घेत असलेल्या अन्य पूरक औषधांविषयी संधिवातज्ज्ञांना माहिती द्या. यामुळे योग्य समन्वय साधला जाऊन उपचार सुरक्षितपणे व सुरळीतपणे देणे शक्य होते.

अधिक माहितीसाठी कृपया येथे भेट द्या – http://nccam.nih.gov/health/ayurveda/introduction.htm

आजच्या काळात जगभरात वापरल्या जाणार्‍या औषधोपचार पद्धतींमध्ये ऍलोपॅथी सर्वात जास्त प्रचलित आहे. विशेष म्हणजे, एखाद्या रुग्णास एखाद्या विशिष्ट औषधाचे साईड इफेक्ट्स जाणवलेले असू शकतात, परंतु त्याच वेळी तीच औषधे घेत असणार्‍या दुसर्‍या रुग्णाला मात्र कोणतेही दुष्परिणाम जाणवत नाहीत. एखाद्या औषधाचे साईड इफेक्ट्स हे वय, आरोग्याची सामान्य स्थिती, लिंग, आजारपणाची तीव्रता, पूर्वीच्या औषधांच्या ऍलर्जी इत्यादींवर अवलंबून असतात. तुम्ही संधिवातज्ज्ञांकडून नियमितपणे तपासणी करून घेत असल्यास ही औषधे पूर्णपणे सुरक्षित आहेत.

यांमुळे आपल्याला तात्पुरत्या स्वरुपात आराम पडल्याचे जाणवू शकते, परंतु या उपचारांमुळे संधिवात बरा होत असल्याचे कोणतेही शास्त्रीय पुरावे उपलब्ध नाहीत.