पाठदुखीने त्रस्त?
तरुणांमध्ये पाठीच्या कण्यातील वेदना आणि ताठरपणाचा कालावधी तीन महिन्यांहून अधिक असल्यास व खालीलपैकी किमान चार लक्षणे लागू होत असल्यास हा बांबूवात अथवा मणक्याचा संधिवात असू शकतो.
- चाळीशी येण्यापूर्वी सुरुवात होते.
- लक्षणे अचानक न जाणवता ती हळूहळू दिसू लागतात.
- व्यायाम केल्यानंतर सुधारणा जाणवते.
- विश्रांती घेतल्याने सुधारणा होत नाही.
- रात्री अधिक वेदना असल्याचे जाणवते.