प्रशिक्षण

डॉ. पाटील यांनी 2002 मध्ये टी एन मेडिकल कॉलेज (नायर हॉस्पिटल) मुंबई येथून एमएमबीएस पूर्ण केले. एका वर्षाच्या इंटर्नशिपनंतर त्यांनी बॉम्बे हॉस्पिटलच्या मधुमेह आणि एंडोक्रायोलॉजी विभागात काही काळ काम केले. पदव्युत्तर शिक्षणासाठी ते UK ला गेले. रॉयल कॉलेज ऑफ फिजीशियन्स, लंडन येथून इंटर्नल मेडिसीनमध्ये त्यांनी एमआरसीपी प्राप्त केली. डॉ. पाटील यांनी लंडन डीनरीमधून रुमॅटोलॉजीमध्ये सुपर स्पेशलायझेशन केले. 5 वर्षाच्या प्रशिक्षण कालावधीदरम्यान त्यांनी रुमॅटोलॉजीमध्ये दांडगा अनुभव संपादन केला.

  • युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन हॉस्पिटलमध्ये लुपसच्या (SLE) रुग्णांचे व्यवस्थापन करण्याचा व्यापक अनुभव.
  • रॉयल फ्री हॉस्पिटलच्या आंतरराष्ट्रीय केंद्रात स्क्लेरोडर्मा (Systemic sclerosis) व्यवस्थापनासाठी कार्य केले.
  • साऊथएंड युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये vasculitis चे (रक्तवाहिन्यांचा दाह) व्यवस्थापन आणि मस्क्युलस्केलेटल अल्ट्रासाऊंडचा वापर करण्याचा अनुभव प्राप्त केला.
  • सुपर स्पेशालिटीच्या अनुभवामध्ये संधिवाताचे लवकर निदान, ऑस्टियोपोरोसिस (हाडे ठिसूळ होणे), आमवातासाठी नवीन उपचार, हायपरमोबिलिटी, सर्कोइडोसिस (Sarcoidosis) आणि किशोरवयातील संधिवात (JIA) यांचा समावेश आहे.

 रूमॅटोलॉजीमध्ये CST प्राप्त केल्यानंतर ते साऊथएंड युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये संधिवाततज्ञ म्हणून कार्यरत होते.