आमच्याविषयी

डॉ. प्रवीण पाटील विषयी

डॉ. प्रवीण पाटील हे प्रसिद्ध संधिवात रोग तज्ज्ञ असून संधिवात व तत्सम रोगप्रतिकारशक्तीच्या  आजारांवरील आधुनिक उपचार पद्धती संदर्भात त्यांचा दांडगा अनुभव आहे. इंग्लंड मधील आपल्या दहा वर्षांच्या वास्तव्यामध्ये संधिवात व रोगप्रतिकार शक्तीचे आजार या विषयात त्यांनी दांडगा अनुभव संपादन केला आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन, रॉयल फ्री, व्हिप्स क्रॉस व साऊथएंड युनिव्हर्सिटी अशा प्रतिष्ठित हॉस्पिटलमध्ये त्यांनी काम केले आहे. भारतात परतण्यापूर्वी ते ‘साऊथएंड युनिव्हर्सिटी हॉस्पिटल’ येथे संधिवात तज्ज्ञ म्हणून कार्यरत होते.

त्यांच्या नावे अनेक लेख व वैज्ञानिक साहित्य प्रकाशित झाले आहे. अमेरिकन कॉलेज ऑफ ऱ्हुमॅटॉलॉजी व ब्रिटीश सोसायटी ऑफ ऱ्हुमॅटॉलॉजी या संस्थांच्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी आपले संशोधन सादर केले आहे.

स्वारस्य:
नवीन संकल्पना व तंत्रज्ञान यांचा वापर करून ग्रामीण व शहरी आरोग्य सेवा यांमधील तफावत दूर करणे, प्रसार माध्यमे, वैद्यकीय लिखाण, सल्लागार सेवा.