सिद्धांत
“आपले वैद्यकीय ज्ञान आणि कौशल्य सतत अद्ययावत ठेवत डॉ. पाटील यांची प्रॅक्टिस सुरू आहे.त्यांचा विश्वास आहे की, रुग्णांना त्यांच्या आजाराविषयी योग्य माहिती देऊन त्यांना त्यांच्या उपचारांबद्दलच्या निर्णयात सामील केले पाहिजे.”
परिचय डॉ. प्रवीण पाटील
संधिवाततज्ञ एमबीबीएस(मुंबई), एमआरसीपी(यूके), सीसीटी(लंडन)
डॉ. प्रवीण पाटील हे प्रसिद्ध संधिवात तज्ज्ञ असून संधिवात व तत्सम रोगप्रतिकारशक्तीच्या आजारांवरील आधुनिक उपचार पद्धती संदर्भात त्यांचा दांडगा अनुभव आहे. इंग्लंड मधील आपल्या दहा वर्षांच्या वास्तव्यामध्ये संधिवात व रोगप्रतिकार शक्तीचे आजार या विषयात त्यांनी दांडगा अनुभव संपादन केला आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन, रॉयल फ्री, व्हिप्स क्रॉस व साऊथएंड युनिव्हर्सिटी अशा प्रतिष्ठित हॉस्पिटलमध्ये त्यांनी काम केले आहे. भारतात परतण्यापूर्वी ते 'साऊथएंड युनिव्हर्सिटी हॉस्पिटल' येथे संधिवात तज्ज्ञ म्हणून कार्यरत होते.त्यांच्या नावे अनेक लेख व वैज्ञानिक साहित्य प्रकाशित झाले आहे. अमेरिकन कॉलेज ऑफ रुमॅटोलॉजी व ब्रिटीश सोसायटी ऑफ रुमॅटोलॉजी या संस्थांच्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी आपले संशोधन सादर केले आहे.